महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ

असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम 2008 ची अंमलबजावणी करण्याकरिता या अधिनियमाच्या कलम 6 (1) अन्वये राज्य शासने दि. 03 एप्रिल 2018 रोजीच्या अधिसुचने अन्वये महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ गठीत केले आहे.


असंघटित कामगार (व्याख्या)

गृह उद्योग करणारा कामगार, स्वयंरोजगार करणारा कामगार किंवा असंघटित क्षेत्रात वेतनावर काम करणारा कामगार किंवा संघटीत क्षेत्रातील कामगार भरपाई कायदा, 1923 औद्योगिक विवाद अधिनियम, 1947 कर्मचारी राज्य विमा अधिनियम, 1948 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अधिनियम, 1952 प्रसूतीलाभ अधिनियम, 1961 आणि उपदान प्रदान अधिनियम, 1972 लागू नसलेला कामगार.

vision

दृष्टीकोन

  • असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे.
  • असंघटित क्षेत्रातील निम्नतर घटकांपर्यंत पोहोचून त्या क्षेत्रातील कामगारांकरिता कल्याण योजना राबविणे.
  • असंघटित क्षेत्राला सेवा पुरविताना प्रक्रियांचे सुसूत्रीकरण करणे व त्यात पारदर्शकता बाळगणे.
  • कार्यक्षम सार्वजनिक तक्रार निवारण यंत्रणा उभी करणे.
mission

लक्ष्य

  • असंघटित क्षेत्रातील कामगार निश्चित करून त्यांचा समावेश विविधविषयक योजनांचे लाभार्थी म्हणून करणे.
  • असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविणे.
  • राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने मंजूर केलेल्या विविध कामगार कायद्यांची अंमलबजावणी करून असंघटित क्षेत्रातील कामगारांचे राहणीमान उंचावण्याकडे लक्ष देणे.
  • विविध प्रकारचे रोजगार व स्वयं-रोजगार करणा-या कामगारांचे राहणीमान, कल्याण व सामाजिक दर्जा यांविषयी सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणे.
  • असंघटित क्षेत्रातील कामगारांचे एकूण राहणीमान व सामाजिक दर्जा उंचावणे.

महत्वाचे पदाधिकारी

मा. श्री. एकनाथ शिंदे

मा. मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य

मा. श्री. सुरेश (भाऊ) दगडू खाडे

मा. कामगार मंत्री
महाराष्ट्र राज्य

श्रीमती विनिता वेद सिंगल (भा.प्र.से.)

प्रधान सचिव
कामगार विभाग

श्री. सतीश देशमुख (भा.प्र.से.)

विकास आयुक्त
(असंघटित कामगार)
-->

महत्वपूर्ण लिंक्स